श्री रामवरदायिनी देवी वार्षिक तिथी उत्सव २०२२
श्री साळुबाई सोमैय्या केदार महालक्ष्मी रामवरदायिनी प्रसन्न !
वर्षाच्या बारा महिने येणाऱ्या तिथीपोवती सण उत्सवानुरूप धार्मिक विधींचे आयोजन परंपरेने देवस्थानचे शिंदे मोकाशी खोत इनामदार मानकरी यांचे हस्ते व देवस्थानचे उपाध्याय, समस्त शिंदे-कदम खोत मोकाशी इनामदार समाज बांधव व देवस्थान विश्वस्त यांच्या हजारोंच्या उपस्थितीत साजरे केले जातात.
यापैकी सर्वात महत्वाचा व लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहाने साजरा होणार सण म्हणजे चैत्र पौर्णिमेला होणारी श्री रामवरदायिनी देवीची जत्रा.