कुलाचार दसपटीची पूरातन मुद्रा
दसपटीच्या मुद्रेत दशमांकित फणिधर नाग असून ते शेषवंशी शिंदे घराण्याचे प्रतीक आहे. आजही शिंदे घराण्यातील देव्हाऱ्यात नागाची पूजा केली जाते.
ज्योती व सूर्य हे ज्योतिबा कुलदेवताचे प्रतीक मानले गेले आहेत. तलवार हे क्षात्रतेज दर्शक धर्म संरक्षक प्रतीक असून ॐ हे मित्याक्षर परब्रह्म आहे. तर ध्वजस्तंभी सूर्य व नाग आहेत.
ही सर्व उदयोन्मुख पराक्रमी संस्कृतीची प्रतीके मानली जातात. सप्तसिंधूतील आर्य संस्कृतीत ही चिन्हे प्रामुख्याने आढळून येतात.
श्रीरामवरदायिनीचे आसन अश्व हे असून ते नागवंशी शिंदे घराण्याचे प्रतीक आहे.