|| अनादि सोऽहम् कुलस्वामिनी रामवरदायिनी नमो नमः || || नित्य कराहो नामस्मरण सुखी होइल जीवन ||

प्रभु रामचंद्र १४ वर्षाच्या वनवासात वृक्षवेलींना आलींगन देत सितेच्या शोधात फिरत होते. तेव्हा विरही प्रभू रामचंद्राची परिक्षा पाहण्यासाठी देवी पार्वती सीतेचे रुप घेऊन त्यांच्या पूढे आली.
श्री प्रभू रामचंद्रांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले व वृक्षवेलींना भेटत पूढे मार्गक्रमण करीत राहीले. पार्वती पुन: पूढे आली. श्रीराम पुन्हा बाजुला झाले. तीन चार वेळा हा प्रकार झाल्यावर प्रभू रामचंद्रांनी सीतेचे रुप घेतलेल्या पार्वतीला अंतर्ज्ञानाने क्षणात ओळखले.
ते म्हणाले, माते, तू माझी सीता नाहीस. तू सती पार्वती आहेस. प्रभु रामचंद्रांचे हे शब्द ऐकताच पार्वतीने मुळ रुप प्रगट करुन प्रभू रामचंद्रांना आशिर्वाद दिला व सीतेची शुध्दी सांगितली व लंकेचा मार्ग दाखविला आणि सांगितले सीता शुध्द आहे. तिची रावणाकडून सुटका होईल व रावणाचा पराभवही तुझ्या हातून होईल.
श्रीरामचंद्रांना वर देणारी म्हणून श्रीरामवरदायिनी.

श्रीरामवरदायिनी माता म्हणजे तळ कोकणातील क्षात्रकुळाची कुलदेवता !! शिंदे-कदमांचे आराध्य दैवत !! १३ गावांच्या दसपटीची कुलस्वामिनी म्हणजेच श्रीरामवरदायिनी !!

देवळाचे मुख्य प्रवेशद्वार

मंदिरात साजरे होणारे महत्त्वाचे सण

सणांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा => यादी