श्रीरामवरायिनी स्तोत्र
देखिली तुळजामाता । निवालो अंतरी सुख ।
तुटली सर्वही चिंता । थोर आधार वाटला ।।
आघात संकटे वारी । निवारी दुष्ट दुर्जना ।
शंकटी भर्वसा मोठा । तत्काळे काम होतसे ।।
सर्वही बालके जीची । त्रैलोक्य जननी पाहा ।
साक्षिणी सर्व लोभाळू । मर्यादा कोण रे करी ।।
सर्वाची मूळ हे माया । मूळमाया म्हणोनिया ।
सृष्टीची आद्य शक्ती । आदिशक्ती म्हणोनिया ।।
राम उपासना आहे । हे राम वरदायिनी ।
सख्य ते चालते सर्व । प्रवृत्ति निवृत्तीकडे ।।
शक्तीने मिळती राज्ये । युक्तिने टिकती सये ।
शक्तीr युक्ती आम्हा देणे ।
श्रीरामवरदायिनी ।।
श्रीरामवरदायिनीची आरती
जयदेवी श्रीरामवरदायिनी माता ।
आरती ओवाळीतो कर जोडुनी आता । जयदेवी । जयदेवी ।धृ ।।
वंत कुलाची तू असशी स्वामिनी
महाराष्ट्राची आई तुळजा भवानी
अवतरलीस येथे तू भक्ता कारणी
पावसी नवसाला प्रसन्न होऊनी ।।१।। जयदेवी ।।धृ।।
दादर-मजरे गांवी स्थापना झाली
अश्वारुढ होउनी आसनी बैसली
भावे स्मरती भक्त नित्य नेमाने
चैत्र पोर्णिमेला भजती प्रेमाने ।।२।। जयदेवी ।।धृ।।
गिरीजा रमा विद्या, त्रय तूही माते
प्रसन्न होऊनी पावशी असंख्य भक्तांचे
धावत ये वरदायिनी, जन-कल्याणाते
वंश-दिपक वंदिती तुझीया चरणाते ।।३।।
जयदेवी, श्रीरामवरदायिनी माता ।। आरती ओवाळीतो ।
कर जोडूनी आता ।। जयदेवी । जयदेवी ।।
नमस्कार
पहिला नमस्कार उद्या चलाला,
इश्वर रुपे जपतो जगाला.
दुसरा नमस्कार करू धरणी माते, धनधान्य देऊनी आम्हा तोषविते
तिसरा नमस्कार गुरुजी तुम्हाला, ज्ञानअमृताचा आम्हा बोध झाला
चौथा नमस्कार तव चरणी माते, जन्मासी घालून आम्हा वाढविते.
पांचवा नमस्कार पितयाचे पायी, मजतोल जाता रक्षी ठाई ठाई