|| अनादि सोऽहम् कुलस्वामिनी रामवरदायिनी नमो नमः || || नित्य कराहो नामस्मरण सुखी होइल जीवन ||

कदंब उर्फ कदम घरण्याचे प्राचीन अस्तित्व

कदंब घराणे सूर्यवंशी ब्रम्हशाखेत येते. त्याच्या वसाहती १) बनवासी २) गोपत्तन (गोवे, गोपपूरी गोपकपट्टण) पत्नाशिका, हल्सी (हनगळी) या ठिकाणी झाल्या इ. स. ११० पूर्वी कदंब राज्याच्या सत्तेखाली गोमंतकांत नांदत असल्याची माहिती तांब्रपटातून मिळते. कदंबकडून शाळीवाहनाकडे, त्यांच्याकडून चाळुक्याकडे व पुढे त्यांच्याकडून कदंब वंशी जयकेशीने परत राज्य मिळविले. १०५३-८० व गोपकपट्टण येथे आपली राजधानी करुन स्वतंत्र राज्यकारभार करु लागला. पुढे पाच पिढ्या राज्य केले. वीरजकेशीच्या वेळी सत्पकोटीष देवस्थान भरभराटीस आले. १९९३ इ.स. कदंबावर यादवंशी बल्लाळांशी स्वारी करुन त्यांचे कडून खंडणी घेऊ लागले. पुढे देवागिरीच्या राज्याचे प्राबल्य होऊन कदंब त्यांचे मंडलीक झाले. पुढे १४ व्या शतकात (१३४५) अल्लाऊद्दीन खीलजीने देवगीरीवर स्वारी केली व त्यांना पादाक्रांत केले. तेव्हा त्यांचे सेनानी गोव्यात घुसले असता. कदंबानी शौर्याची पराकाष्ठा केली. पण यश आले नाही. पुढे १३९७ इ.स.मध्ये विजयनगरच्या हरिहर राजाने आपला शुर सेनानी माधव यास गोमांतकात प्रचंड सैन्यासह पाठवीला व यवनी सत्तेपासून मुक्तता केली. त्याचे नावाने तेथे माधवती तिर्थ व ब्रम्हपुरी ची स्थापना केली आहे. तेव्हा गुलबग्र्याचे महामदास (बहामनी राज्यास) ते खपले नाही. पुढे फिरोजशहा बहमनीने मोठे सैन्य पाठवून इ.स. १४६८ मध्ये तह केला. व इ. स. १४९७ मध्ये गोमांतक विजापूरचे आदीलशाहीत समाविष्ठ झाला. इ. स. १५१० चे दरम्यान पोर्तुगीजांनी गोवे शहर हस्तगत केले.

सर्वप्रथम या सूर्यवंशी राजाचे नगर केदार (कंधहार) येथे पहिले स्थापन केले होते. कदंब घराण्याचा वंश स्थापक पहिला वंशधर राजा मयुरवर्मा याचे अंगणात कदंबाचे एक विस्तीर्ण झाड होते व त्याचे दैवत होते. तो नित्यादिनी त्याची पूजाअर्चा करीत असे. तो अति पराक्रमी व सार्वभोम राजा होता. तेथपासून त्याचे वंशजास कदंब असे नाव पडले. त्या वंशजापैकी कदंब (हरीवर्मा पांचवे) शतकाचे वेळी राज्य करीत होता. त्यावेळी सेंद्रक जयकेशीराजा होता. आजही एखाद्या कर्तृत्ववान पुरषाचे नावाने ते घराणे ओळखण्याचा प्रधात आहे. त्याचे ४ थे पीढीत सातवे शतकात कर्नाटकांत राज्य स्थापन झाले. ते वेळी मृगेशवर्मा याची राजधानी वनवाशी येथे होती. ङ्खदेङ्ग गाव येथील एका शिलालेखांत एका कदंब राजाने गोवे सर केल्याचे वर्णन आहे. तेथील पहिला राजा काळूस्त वर्मन याने आपली सत्ता व वंशविस्तार केला. याच वंशात दुसरा राजा रविवर्मा झाला. याची राजधानी बेळगांवात हसवी येथे होती. त्यांच्या पश्चात सत्ता कमकुवत बनली आणि घराणे जिकडे तिकडे गेली. बदामीचा राजा पुलकेशीत १ ला याने वातापी (विजापूर जिल्ह्यातील बदामी) येथील कदंब राजाचे उच्चाटन करुन ती आपली राजधानी केली. ती बलाढ्य होऊन कर्नाटकचा उत्तर भाग त्याने घेतला (सेंद्रक उर्फ़ शिंदे घराण्यापैकी) नागवंशी होता. रत्नागिरीस खारे पाटण येथे शिंदे घराण्याची वस्ती होती.) त्यामुळे १० वे शतकांत कदंब घराणे जिकडे तिकडे झाले. (अंर्पराजाचा पराभव करुन गोव्याच्या कदंब घराण्यात दुसरा जयकेशी इ.स.११०४ ते ४८ पर्यंत होता. धारवाड येथे नरेंद्र गावांत एक शिलालेख सापडला आहे.) यावेळी काही घराणी धारवाड जिल्ह्यात उत्तर कानडा कर्नाटकात गरगी (गिरवी) गांवी केली. पाच घराण्यापैकीr कदमराव हे वेळे जांबरुख गिरवी मुक्कामी जावळी प्रांती आले. वतनदार झाले. दुसरे गोव्यात १३ वे शतकात गोपच्चन येथे राज्य कर लागले. तिसरे शतकांत ४ ते शतकांत हैद्रबाद येथे मुंगी पैठण येथेंही राज्य वसाहत करुन राहीली. ४ थे शतकांत चंद्रपूरचा राजा देवराज याचा तांब्रपट सापडला आहे त्यानंतर इ.स.११२६ मध्ये अपेराकाने पुन: जयकेशिच्या कदंबांचा पराभव बाहुबळाने केला. गुजरातच्या तालूक्याचे शूरराणी दक्षिणेतील गोपपत्तन येथील कदंब वशांतली होती. कर्ण गुर जरातच्या रजपूत राज्यातील कदंब वशांतली होती. पहिला वंशधर शिंदे (सेंद्रक) यांचे लग्न कदंब राज्यकन्येशी झाले होते. नंतर वनवासी येथे असतांनाही शिंदे-कदंबाचे संबंध पूर्ववत चालत होते. सूर्य व नाग या चिन्हाचा बोध दर्शविते. कारण शिंदे-कदम हे दोन्ही सूर्यवंशी व शेष आणि ब्रह्म शाखेतील आहेत.

कदंबांची एकूण तीन घराणी झाली त्यांत सर्वांत जुने घरणे कर्नाटकातील वैजयंती (वनवासी) यानंतरची घराणी हनगल व गोमांतक. जयसिंह व रणराग चालूक्य हे वनवासीचे कदंबाकडे चाकरीस होते. पहिला चालुक्य राज पुलकेशीने कदंबास मंडलीक केले इ. स. ६१० व इ. स. ९४५-७० मध्ये शिलाहार भिमराजाचे चंद्रपूरच्या कला राज्यावर स्वारी केली. व्हूराज भिलाहराचे चंद्रपूरच्या कला राज्यावर स्वारी केली. रहूराज भिलाहराचे वेळी इ. स. ९९५ मध्ये वैलप तालुक्यांस मदत केल्यामुळे शष्ठदेव कदम यांस महामंडेश्वराचा दर्जा दिधला व राजाने मंडलिकत्व पत्करले. पुढे शष्ठदेवाने शिलाहाराची शक्ति क्षीण होताच त्यांचेवर हल्ला केला व संबंध कोकण हस्तगत करुन घेतला.